रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिराच्या वेळी ठाणे येथील सौ. सविता लेले यांना आलेल्या अनुभूती

‘रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २६.७.२०२३ या दिवशी झालेल्या एका शिबिरामध्ये साधक साधनेतील अनुभव सांगत असतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी डोळे बंद करून वातावरण अनुभवण्यास सांगितले. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. माझे मन हळूहळू पूर्णपणे निर्विचार झाले.

२. ‘वातावरण एकदम स्तब्ध आणि स्थिर झाले आहे. तेव्हा जणू काळ थांबला आहे’, असे मला वाटले.

३. मी ‘स्व’चे अस्तित्व पूर्णतः विसरले. त्याच स्थितीत मला श्री भवानीमातेचे दर्शन झाले.

४. नंतर माझा ‘ॐ’ हा नामजप चालू झाला.

५. ‘हे दैवी वातावरण असेच अनुभवत रहावे. त्यातून बाहेर येऊच नये’, असे मला वाटत होते.

‘हे ईश्वरा, यातून मला प्रेरणा घेता येऊ दे. साधकांचे गुण मला आत्मसात् करता येऊ देत. व्यष्टी आणि समष्टी साधनेची सांगड मला घालता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. ही अनुभूती दिल्याबद्दल गुरुमाऊलीच्या (सच्चिदानंद परब्रह्म डाॅ. जयंत आठवले यांच्या) चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. सविता लेले, ठाणे (२६.७.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक