बंगालमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवट लागू करून हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवावेत !
अहिल्यानगर येथील हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची मागणी !
अहिल्यानगर, १० मार्च (वार्ता.) – बंगाल येथे गेली अनेक वर्षे हिंदूंवर सातत्याने अत्याचार होत आहेत. संदेशखाली येथे हिंदु महिलांवर लैंगिक अत्याचार करणार्या तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला अटक केली आहे. याची दखल स्थानिक पोलिसांनी घेतलेली नाही. तेथे सामान्य हिंदु नागरिकांच्या संविधानिक अधिकारांचे रक्षण होईल, अशी स्थिती नाही. त्यामुळे तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष श्री. वसंत शेठ लोढा आणि बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांनी ९ मार्चला आंदोलनाच्या माध्यमातून केली. नगर येथे हिंदु जनजागृती समिती आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन घेण्यात आले त्या वेळी ही मागणी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, बजरंग दल, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती यांसह राष्ट्र निर्माण पक्षाचे अध्यक्ष श्री. उत्कर्ष गीते, धर्म जागरणचे श्री. महादेव कोकाटे, भाजपचे महावीर कांकरिया, राजेंद्र विद्ये सहभागी झाले होते.
या वेळी खालील मागण्या करण्यात आल्या.
१. नगर येथे मुलींवर अत्याचार करणार्या ‘विनियार्ड ब्लेसेड चर्च’च्या पास्टरवर कठोर कारवाई करण्यात यावी. चर्चमध्ये अशी दुष्कृत्ये चालतात का ? याची चौकशी व्हायला हवी.
२. देवबंद या इस्लामी संघटनेने भारतात ‘गजवा ए हिंद’चा (इस्लामीस्तान) फतवा लागू केला. या संघटनेवर बंदी घालण्यात यावी.
३. पुरातत्व विभागाच्या अधिकार क्षेत्रात येणार्या सर्व मंदिरामध्ये पूजा करण्याचा अधिकार हिंदूंना मिळावा.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? |