श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची अमृतवचने आणि अनमोल विचारधन !
श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठल्याही परिस्थितीत त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करत असणे : ‘तुमच्या देहाचे मडके अध्यात्मात एकदा चांगले सिद्ध झाल्यावर तुम्ही कधीही, कुठेही गेलात, तरी ते फुटत नाही; उलट ते चांगला नाद निर्माण करते. श्री गुरूंच्या शिकवणीत सिद्ध झालेला चांगला साधक कुठेही गेला, कुठल्याही परिस्थितीत असला, तरी तो आनंदी असतो आणि त्याच्यातील आध्यात्मिक आनंदाने सारे जग प्रकाशमान करतो.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ
तुम्ही दुसर्यांचा आधार होता, तेव्हा देव तुमचा आधार होत असणे
इतरांना आपला आधार वाटायला हवा. तुम्ही कुणाच्या आधारासाठी अवलंबून राहू नका. तुम्ही दुसर्यांचा आधार व्हा, तेव्हा देवच तुमचा आधार होईल.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ