६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती दमयंती वालावलकर यांच्या मृत्यूनंतर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता लोटलीकर यांना जाणवलेली सूत्रे

१०.२.२०२४ या दिवशी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर (वय ८५ वर्षे) यांचे निधन झाले. त्या वेळी त्यांच्या घरी गेल्यानंतर सौ. संगीता लोटलीकर यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. आज त्यांच्या निधनाला १ मास होत आहे.

(कै.) श्रीमती दमयंती दामोदर वालावलकर

१. आजींच्या घरी गेल्यानंतर घरामध्ये प्रकाश वाढत असल्याचे जाणवले आणि हळूहळू त्याचे प्रमाणही वाढत गेले.

२. आजींच्या जवळच प.पू. गुरुदेवांचे जीवनदर्शन ही पुस्तिका होती. ती पांढरीशुभ्र झाली होती. मला ती निर्गुण झाल्याचे जाणवले.

३. तिथे त्यांचे नातेवाईक आले होते. तेसुद्धा बोलतांना देवींविषयी माहिती सांगत होते. त्यामुळे तेथे ‘सत्संगच चालू आहे’, असे मला वाटले.

४. आजींच्या अंगाला हात लावल्यावर ‘त्यांचा देह हलका झाला आहे’, असे मला जाणवले.

५. घरात दाब न जाणवता प्रसन्न वाटत होते.

६. माझा ‘निर्विचार’ हा नामजप चालू झाला आणि तो शांतपणे होत होता.

७. ‘आजींनी नामजप करतच देह सोडला असेल’, असे मला सारखे वाटत होते.’

– सौ. संगीता लोटलीकर (वय ६४ वर्षे), फोंडा, गोवा. (१३.२.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक