राजीम कुंभमेळा (छत्तीसगड) येथे सनातनच्या ग्रंथप्रदर्शनाचे पू. राम बालकदास महात्यागी यांच्या हस्ते उद्घाटन !
राजीम कुंभमेळा (छत्तीसगड) – सनातन संस्थेच्या वतीने येथील राजीम कुंभमेळ्यामध्ये धर्म आणि अध्यात्म या विषयांवरील ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले, तसेच धर्मशिक्षण फलकांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पाटेश्वरधामचे संत पू. राम बालकदास महात्यागीजी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी रायपूरच्या ‘शदाणी दरबार तीर्थ’चे पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांचे प्रतिनिधी श्री. महेंद्र तलरेजा, श्री. कपिल सचदेव; ‘गीता प्रेस, रायपूर’चे श्री. रामदेव यादव, सनातन संस्थेचे श्री. हेमंत कानस्कर आणि श्री. दीपक जमनारे आदी उपस्थित होते.
या वेळी पू. राम बालकदास महात्यागीजी यांनी स्थापन केलेल्या यज्ञशाळेत सनातन संस्थेच्या साधकांना येण्याचे निमंत्रण दिले. पू. डॉ. युधिष्ठिरलालजी महाराज यांनी ‘संस्थेच्या प्रदर्शनाला भेट देईन’, असे सांगितले. याप्रसंगी श्री. कानस्कर यांनी पू. राम बालकदास महात्यागीजी यांना सनातन संस्थेने प्रकाशित केलेला ‘औषधी वनस्पती कशी लावावी ?’, हा ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.
क्षणचित्रे
१. संतांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर प्रदर्शनाला भेट देणार्या जिज्ञासूंची संख्या अचानक वाढली.
२. प्रदर्शनाला भेट देणार्या जिज्ञासूंनी सनातन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आणि या प्रदर्शनाला सर्व हिंदूंनी निश्चित भेट द्यावी, अशी भावना व्यक्त केली.