BJP Worker Arrested : मंड्या (कर्नाटक) येथे २ वर्षांपूर्वी आंदोलनामध्ये चुकून ‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्या भाजप कार्यकर्त्यावर आता कारवाई !
कर्नाटकातील काँग्रेस सरकारची सूडबुद्धीने कारवाई !
मंड्या (कर्नाटक) – कर्नाटकच्या विधानसभेत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणार्या तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे; मात्र त्याच वेळी २ वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्यावरून पोलिसांनी भाजपच्या एका कार्यकर्त्याला अटक केली आहे. यावरून भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली आहे.
Mandya (Karnataka) – Action against BJP worker for accidentally saying 'Pakistan Zindabad' in a protest two years ago.
➡️Vindictive action by Karnataka's Congress Government.
When did pro-Pakistan Congress supporters start showing signs of patriotism? pic.twitter.com/s7aDQEdCC5
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 10, 2024
काय आहे हे प्रकरण ?
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी अवमानकारक विधान केले होते. त्याच्या निषेधार्थ २२ डिसेंबर २०२२ या दिवशी मंड्या येथील संजय सर्कल चौकामध्ये भाजपने आंदोलन केले होते. त्या वेळी भाजपचे कार्यकर्ते ‘पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान झिंदाबाद’ अशा घोषणा देत होते. घोषणा देण्याच्या नादात रवि नावाच्या कार्यकर्त्याने गोंधळून जाऊन ‘पाकिस्तान झिंदाबाद’, असे म्हटले. ते एकून अन्य कार्यकर्त्याने रवीचे तोंड बंद केले. आता काँग्रेस सरकार या प्रकरणात भाजपच्या कार्यकर्त्याच्या विरोधात कारवाई करत आहे.
संपादकीय भूमिकापाकप्रेमी काँग्रेसवाल्यांना कधीपासून देशभक्तीचा उमाळा येऊ लागला आहे ? |