Ramnavami Holiday Bengal : बंगालमध्ये प्रथमच रामनवमीची सुटी घोषित !
कोलकाता (बंगाल) – बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारने रामनवमीनिमित्त १७ एप्रिलला सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. तृणमूल सरकारने वर्ष २०११ पासून राज्यात सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच रामनवमीला सार्वजनिक सुटी घोषित केली आहे. गेल्या काही वर्षांपासून बंगालमध्ये रामनवमीच्या मिरवणुकांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. गेल्या वर्षीही रामनवमीच्या मिरवणुकांच्या वेळी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.) याची चौकशी करत आहे.
#Bengal declares a Public Holiday on #RamNavami for the first time ever !
After the #RamMandirPranPrathistha in Ayodhya #Hindus have started awakening. Hence as a result it is clear that the #TrinamoolCongress and #MamataBanerjee have decided to declare Ramnavami as a holiday to… pic.twitter.com/J6BsWm1552
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 10, 2024
भाजपच्या दबावाखाली रामनवमीच्या सुटीचा निर्णय ! – भाजपचा दावा
राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी भाजपच्या दबावाखाली ममता बॅनर्जी सरकारने रामनवमीच्या सुटीचा निर्णय घेतल्याचा दावा केला आहे. सुवेंदू अधिकारी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करतांना लिहिले की, जानेवारी मासात मी रामनवमीला सुटी न दिल्याने राज्य सरकारवर टीका केली होती, आज राज्य सरकारला सुटी घोषित करणे भाग पडले.
On January 15th, I had highlighted how the List of Holidays in the Govt of WB Yearly Calendar didn't mention any holiday on the auspicious occasion of Shree Ram Navami.
Thereafter, the WB Govt didn't find it appropriate to declare a public holiday on January 22 for the historic… https://t.co/FoEQDM2nx4 pic.twitter.com/Orpfbbb4jV— Suvendu Adhikari (Modi Ka Parivar) (@SuvenduWB) March 10, 2024
भाजपच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख आणि बंगालसाठी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक अमित मालवीय यांनी म्हटले की, ममता बॅनर्जी यांनी हिंदुविरोधी प्रतिमा सुधारण्यासाठी हे केले आहे. खूप उशीर झाला असला, तरी महत्त्वाचे म्हणजे रामनवमीच्या मिरवणुकीत दगडफेक होणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी.
संपादकीय भूमिकाअयोध्येतील श्रीराममंदिरामुळे हिंदू जागृत झाले आहेत. त्याचा परिणाम येत्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला भोगावा लागू नये; म्हणूनच ममता बॅनर्जी सरकारने ही सुटी घोषित केली आहे, हे स्पष्ट आहे ! |