मालदीवने तुर्कीयेकडून खरेदी केले सैनिकी ड्रोन !
मालदीव ड्रोनद्वारे त्याच्या समुद्री क्षेत्रावर ठेवणार लक्ष !
माले (मालदीव) – मालदीव सरकारने त्याच्या समुद्री क्षेत्रात गस्त घालण्यासाठी तुर्कीयेकडून सैनिकी ड्रोन खरेदी केले आहेत. ड्रोनची नेमकी संख्या समजू शकलेली नाही. मालदीवने काही दिवसांपूर्वी चीनकडून शस्त्रे विकत घेण्यासाठी संरक्षण करार केला होता.
सौजन्य : Reporter Flash
मालदीवच्या एका वरिष्ठ अधिकार्याचा संदर्भ देत प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, हे ड्रोन सध्या मालदीवच्या नुनु माफारू आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहेत. ड्रोन संदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
Maldives 🇲🇻 purchases military drones from Türkiye 🇹🇷 !#Maldives will use these drones to patrol a vast maritime area !
India’s enemy nations like Turkey are using Maldives as a medium for conducting anti-India activities.
As such, Maldives is going to prove dangerous for… pic.twitter.com/B3DABXNQ14
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 10, 2024
४ दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत ड्रोनविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला असता संरक्षण मंत्रालयाच्या अधिकार्याने यावर थेट उत्तर देण्यास नकार देत संरक्षण क्षमता वाढवण्यासाठी काम चालू असल्याचे सांगितले.