दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमीपूजन
|
दापोली – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथील उपाजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांचे श्रेणीवर्धन करणे, ग्रामदेवता श्री काळकाईदेवी मंदिर सभामंडप बांधकाम, तसेच दापोली आणि मंडणगड येथील रस्त्यांचे भूमीपूजन ९ मार्च या दिवशी करण्यात आले.
या वेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम, माजी मंत्री रामदास कदम, माजी आमदार सदानंद चव्हाण, जिल्हाधिकारी एम् देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
येथील श्री काळकाई मंदिर सभामंडप बांधकामासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन या वेळी करण्यात आले.
दापोली येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय आहे. ते आता १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी २० कोटी २१ लाख निधी संमत करण्यात आला आहे. याही कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
हायब्रीड अन्युटी या प्रकल्पाअंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी १३८ कोटी ६ लक्ष निधी संमत करण्यात आला आहे. याच्याही कोनशिलेचे उद्घाटन करण्यात आले.