पोलिसांनी काळ्या सूचीतील गोशाळेकडे जनावरे सोपवलीच कशी ?
भंडारा येथील गोशाळेतील जनावरांच्या मृत्यूचे प्रकरण
भंडारा – गेल्या २ वर्षांपासून बळीराम गोशाळेला काळ्या सूचीत टाकले असतांनाही कुरखेडा पोलिसांनी गोशाळेला एवढी जनावरे कशी दिली ? गोशाळा बंद असतांना गोशाळा अध्यक्षांनी ही सर्व जनावरे कशी आत घेतली ? १३९ जनावरांपैकी ४० जनावरे दगावली, तर उर्वरित जनावरे सुरक्षित आहेत का ? असे प्रश्न गोप्रेमींनी उपस्थित केले आहेत.
या गोशाळेत चारा आणि पाणी यांची व्यवस्था नसल्याने त्यातील ४० जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. वर्ष २०२२ मध्ये याच गोशाळेने त्यांच्याकडील अनेक जनावरांना मृत दाखवून त्यांना कत्तलीसाठी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर बनावट मृत्यू प्रमाणपत्र देणार्या ४ पशू वैद्यकीय अधिकार्यांसह गोशाळेचे अध्यक्ष आणि संचालक अशा २२ जणांवर कारवाई करण्यात आली होती.
संपादकीय भूमिकाया प्रकरणात ‘गोवंश हत्याबंदी कायद्याचा गैरवापर होत आहे का ?, तसेच त्यामधील प्रावधानांचा अपलाभ घेऊन पोलिसांनी पकडलेली जनावरे पुन्हा कत्तलींसाठी नेण्यात येत आहेत का ?’, असे प्रश्न कुणाला पडल्यास चूक ते काय ? |