रशिया-युक्रेनच्या युद्धसीमेवर भारतीय तरुणांना पाठवणार्यांचा सूत्रधार वसईत असल्याचे उघड !
वसई – परदेशात नोकरी देण्याच्या निमित्ताने भारतीय तरुणांना रशिया-युक्रेनच्या युद्धसीमेवर पाठवणार्यांचा सूत्रधार वसई येथील फैजल खान उपाख्य बाबा असल्याचे सीबीआयच्या अन्वेषणात उघड झाले. त्याची ६ घंटे चौकशी करण्यात आली. सध्या तो दुबईत रहातो. या प्रकरणात त्याला सुफियान दारूगर आणि त्याची पत्नी पूजा दारूगर यांनीही साहाय्य केले; पण त्या दोघांच्या संदर्भात कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
फैजल हा ‘बाबा ब्लॉग’ नावाच्या युट्यूब वाहिनीवरून परदेशात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन भारतीय तरुणांना द्यायचा. सुफियान आणि पूजा कागदपत्रे घेऊन फैजलला पाठवत. आतापर्यंत फैजलने १६ जणांना रशिया- युक्रेन युद्धक्षेत्रात पाठवले होते.
संपादकीय भूमिका :या प्रकरणाशी संबंधित असणार्या सर्वांचीच सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करून भारतीय तरुणांना सुरक्षा पुरवावी ! |