युरोपियन संस्कृतीची असभ्यता !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
‘व्यापार आणि सैन्य यांच्या जोरावर युरोपियन लोक जगभर पसरले. त्यामुळे त्यांची स्वत:च्या सभ्यतेची (Civilization) स्थानिक संस्कृतीशी गाठ पडू लागली. त्यांनी दुसर्या कोणत्याही समाजाची सभ्यता जवळून पाहिली अथवा अनुभवली नाही. त्यामुळे आपली तीच ‘सभ्यता’ आणि इतर लोक रानटी (primitive) अशी कल्पना त्यांनी करून घेतली. ही धारणा आणि अनुवांशिक औधत्य (उद्धटपणा) या दोहोंच्या कचाट्यात असलेल्या युरोपियनांनी सांस्कृतिक चालीरितींचा, त्या संस्कृतीच्या संदर्भात योग्य अर्थ न लावता मनमानी अर्थ लावले. त्यामुळे युरोपात समाजशास्त्र उरलेच नाही. या वांशिक औधत्याने समाजशास्त्रच काय; परंतु कोणतेही शास्त्र उत्पन्न होणे अशक्य !’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०२३)