India Maldives Relations : भारतीय पर्यटकांनी मालदीवमध्ये यावे ! – मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष नाशीद
मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष नाशीद यांनी भारतियांची क्षमा मागत केले आवाहन !
नवी देहली – भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाचा मालदीववर परिणाम झाला आहे. मला याची फार काळजी वाटते. मालदीवच्या लोकांना क्षमा करा. आम्ही दिलगीर आहोत. भारतीय पर्यटकांनी त्यांच्या सुटीच्या दिवशी मालदीवमध्ये यावे, अशी आमची इच्छा आहे.
Former Maldivian President Mohamed Nasheed appeals for Indian forgiveness.
'Indian tourists should visit Maldives.'
Former President Nasheed, known for his positive relations with India, makes this appeal. Indians hold no grudge against him; however, President Muizzu is… pic.twitter.com/xAfjKi7kpb
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 9, 2024
आमच्या आदरातिथ्यात कोणताही पालट होणार नाही, असे आवाहन मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष महमंद नाशीद यांनी केले. ते सध्या भारताच्या भेटीवर आहेत. त्यांनी या वेळी मालदीवच्या जनतेच्या वतीने क्षमा मागितली आहे.
#WATCH | Delhi: On the drop in Indian tourists and how much it has impacted the Maldives, former President of Maldives Mohamed Nasheed says, “It has impacted a lot. I am here in India, very worried about this. I want to say the people of the Maldives are ‘sorry.’ We are ‘sorry’… pic.twitter.com/RoHwu9TgqQ
— ANI (@ANI) March 8, 2024
संपादकीय भूमिकामाजी राष्ट्रपती नाशीद यांचे भारताशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे ते अशा प्रकारचे आवाहन करत आहे. त्याच्याविषयी भारतियांना कोणताही राग नाही; मात्र राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे भारतद्वेषी आणि चीनप्रेमी आहेत. त्यांच्यात जोपर्यंत पालट होत नाही, तोपर्यंत भारतीय मालदीवमध्ये जाणार नाहीत ! |