यवतमाळ येथे ४ धर्मांधांनी लुटलेला २७ लाखांचा मुद्देमाल जप्त !
आर्णी (यवतमाळ), ८ मार्च (वार्ता.) – येथील सराफा व्यापारी विशाल लोळगे आणि रणजित काटे त्यांचे दुकान बंद करून दागिने अन् रोख घेऊन निघाले. त्यांच्या पाळतीवर असलेल्या लुटारूंनी डोळ्यांत मिरचीपूड टाकून आणि शस्त्रांचा धाक दाखवून २७ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटला. याची तक्रार प्रविष्ट करताच स्थानिक पोलीस, सायबर सेल आणि यवतमाळ गुन्हे शाखेने संयुक्त अन्वेषणास आरंभ केला. उमरखेड येथील ४ धर्मांधांनी या प्रकरणात आपली ओळख न पटण्याची पूर्णपणे काळजी घेतली होती; मात्र पोलिसांनी शेख निसार शेख उस्मान, फय्याज खान बिस्मिला खान, शेख अफसर शेख शरिक, जमीर शेख फैमोद्दीन यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला.