महाप्रसादाच्या आयोजनासाठी घ्यावी लागणार ‘ऑनलाईन’ अनुमती !

विषबाधेच्या प्रकरणांची अन्न आणि औषध प्रशासनाकडून गंभीर नोंद !

नाशिक – गेल्या काही दिवसांपासून महाप्रसादातून विषबाधा झाल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने याची गंभीर नोंद घेतली आहे. ८ मार्च या दिवशी महाशिवरात्री निमित्तानेही भंडारा आणि महाप्रसाद यांचे आयोजन ठिकठिकाणी करण्यात आले. आता महाप्रसादाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी १०० रुपये शुल्कासह ‘ऑनलाईन’ अनुमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याविषयाची नियमावली अन्न आणि औषध प्रशासनाने लागू केली आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे लागणार आहे. पडताळणीसाठी प्रशासनाची पथकेही सिद्ध करण्यात आली आहेत. नियमांचे पालन न केल्यास अन्न, सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार कारवाई केली जाईल, अशी चेतावणी प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अशा आहेत सूचना ! 

१. संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ नोंदणी करणे.

२. शुद्ध पाण्याचा वापर.

३. कच्चे अन्नपदार्थ नोंदणीकृत परवानाधारकांकडूनच खरेदी करावेत.

४. महाप्रसाद बनवतांना योग्य ती दक्षता घ्या.

५. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याची काळजी घ्या.