ध्वनीप्रदूषणासारखे उघड गुन्हे करणार्या गुन्हेगारांवर कारवाई न करणार्या पोलिसांवर कारवाई करा !
‘बाल हक्क संरक्षण आयोगाने गोवा राज्यातील हणजूण आणि वागातोर येथील मद्यालये, क्लब आणि उपाहारगृहे यांच्याकडून होणार्या ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भात तातडीने अन् कठोरपणे कारवाई करण्याचे निर्देश गोवा पोलीस, गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. ध्वनीप्रदूषणाविषयी विद्यार्थी आणि पालकवर्ग यांच्याकडून आलेल्या अनेक तक्रारींनंतर आयोगाने हे निर्देश दिले आहेत. ध्वनीप्रदूषणामुळे मुलांची एकाग्रता भंग झाल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.’ (५.३.२०२४)