पाकिस्तानचा ‘गरीब २०’मध्ये नक्कीच समावेश होईल !
पाकिस्तानात महागाई २० टक्क्यांवर पोचली आहे. लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणे दुरापास्त झाले आहे. परकीय गंगाजळी १० अब्ज डॉलरही (८३ सहस्र कोटी रुपये) नाही. पाककडे परकीय गुंतवणूक नाही. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ‘बेल आऊट पॅकेज’ दिले नाही, तर अर्थव्यवस्था कोलमडेल, अशी दुःस्थिती ! तरीही पाकचे नवीन पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे वर्ष २०३० पर्यंत ‘जी २०’ संघटनेचा सदस्य बनण्याचे स्वप्न आहे. (‘जी २०’ म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) पाकचा ‘जी २०’मध्ये नाही; पण ‘गरीब २०’मध्ये समावेश नक्कीच होईल !
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्लेषक
(डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या फेसबुकवरून साभार)