(म्हणे) ‘भारताच्या कृतीमुळे सीमेवरील तणाव वाढेल !’ – चीन
चीन सीमेवर भारताने सैनिकांची संख्या वाढल्यावर चीनचा थयथयाट !
नवी देहली – भारताने चीन समवेतच्या प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर सैनिकांची संख्या वाढवल्यावर चीनला मिरच्या झोंबल्या आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, भारताच्या या निर्णयामुळे सीमेवरील तणाव वाढेल.
'India's actions will increase tension along the border !' – China's baffled reaction to the increased number of Indian soldiers along the #China border
🇨🇳 which states that tension will escalate as a result of increased number of 🇮🇳 troops is not only increasing… pic.twitter.com/ZkFL1a1FVd
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 8, 2024
वरिष्ठ भारतीय अधिकार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, पूर्वी पाकिस्तानच्या सीमेवर तैनात असलेल्या १० सहस्र सैनिकांची तुकडी चीनच्या सीमेच्या एका भागाचे रक्षण करण्यासाठी पुन्हा तैनात करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त चिनी सीमेसाठी सुरुवातीला नियुक्त केलेला ९ सहस्र सैनिकांचा विद्यमान गट आता नव्याने स्थापन झालेल्या लढाऊ कमांडचा भाग असणार आहे.
संपादकीय भूमिकाभारताने सैनिकांची संख्या वाढल्यावर तणाव वाढेल म्हणणारा चीन गेल्या काही वर्षांपासून सीमेवर सैनिकांची संख्याच वाढवत नाही, तर तेथे सोयीसुविधांसह शस्त्रसाठाही जमा करत आहे. यावर मात्र चीन मौन बाळगतो ! |