‘मोदी गॅरंटी’ विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार ! – पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस
मुंबई – एका व्यक्तीची ‘गॅरंटी’ म्हणजे एका व्यक्तीचा प्रचार आहे. जनतेच्या पैशातून एका व्यक्तीचा प्रचार योग्य नाही. जनतेच्या पैशातून हा व्यक्तीगत प्रचार करण्यात येत आहेत. सर्व पेट्रोल आस्थापनांना पेट्रोल पंपांवर ‘मोदी की गॅरंटी’ असे फलक लावण्याचा आदेश देण्यात आला आहे. आतापर्यंत जेवढा खर्च केला, तो वसूल करण्यात यावा. मोदी यांची ‘गॅरंटी’ (आश्वासन) योग्य नाही. भाजपच्या या प्रचारतंत्राच्या विरोधात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहोत, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे केले.