‘जिवाने साधना केली नसेल, तर त्याला मृत्यूनंतर गती मिळण्यास फार कठीण होते’; म्हणून जिवाने जिवंतपणी गांभीर्याने साधना करून मुक्त होणे आवश्यक असणे
‘बर्याच वेळा मनुष्य मायेत इतका गुंतलेला असतो की, त्याला साधनेचे महत्त्व मृत्यूनंतर कळते. जिवाने साधना केली नसेल, तर त्याला मृत्यूनंतरची गती मिळणे कठीण होते; परंतु तेव्हा लक्षात येऊन काही उपयोग नसतो; कारण पुन्हा नरजन्म मिळणे अवघड असते. त्यामुळे मनुष्यदेह असेपर्यंतच गांभीर्याने साधना करून मुक्त व्हावे.’ – श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ