साधकांनो, ‘सेवांसाठी साधक अल्प आहेत’, असा विचार न करता ‘देवाने मला घडवण्यासाठी मोठी संधी दिली आहे’, असा विचार करून अधिकाधिक सेवा शिकून घ्या !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सनातनचे अध्यात्म आणि धर्म प्रसारकार्य सर्वच अंगांनी विस्तारत आहे; पण तळमळीने अन् झोकून देऊन कार्य करणारे साधक आणि कार्यकर्ते यांची संख्या मोजकीच आहे. त्यामुळे ‘सेवा अधिक आणि ती करणारे अल्प’, असे नेहमीच होते. भगवंत पुढच्या पुढच्या टप्प्याची साधना शिकवत असल्याने प्रत्येक सेवेची व्याप्तीही पुष्कळ वाढली आहे आणि पुढे ती आणखी वाढणार आहे.

साधकांनी स्वतःत निर्माण झालेले सेवेचे कौशल्य आणि स्वतःची क्षमता यांचा पुरेपूर वापर केल्यास भगवंताचे साहाय्य लाभून सेवा जलद गतीने होऊ लागेल. साधकांची आध्यात्मिक क्षमता वाढल्यावर अल्प साधकांमध्येही परिणामकारक सेवा आणि साधना होऊन फलनिष्पत्ती वाढेल ! पुढे आपल्याला हिंदु राष्ट्र चालवायचे असल्याने ईश्वर साधकांना अधिकाधिक सेवेची संधी देत आहे. त्यामुळे साधकांनी ‘सेवांसाठी साधक अल्प आहेत’, असा विचार न करता ‘देवाने मला घडवण्यासाठी ही मोठी संधी दिली आहे’, असा विचार करून अधिकाधिक सेवा शिकून घ्याव्यात !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (७.२.२०२४)