रिक्शा जागेवर लावण्याच्या किरकोळ कारणावरून धर्मांधांची औंध (पुणे) येथील हिंदु कुटुंबाला मारहाण !
हिंदु कुटुंबातील महिलेचे कपडे फाडून अश्लील भाषेत शिवीगाळ !
पुणे – येथील औंध येथे घरासमोरील वाहनतळात रिक्शा लावण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सलमान शेख याने बबलू यादव यांना शिवीगाळ केली. त्यानंतर बबलू यादव यांच्या पत्नी रत्ना यादव आणि मुलगा गौरव यांनाही सलमानची आई आयेशा हिने शिवीगाळ करत मारहाण करून अंगावरील कपडे फाडले, गळ्यातील मंगळसूत्र तोडले. त्यानंतर त्यांनी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिथेही आयेशा पोलिसांच्या समोर त्यांना शिवीगाळ करत होती. (पोलिसांनाही न जुमानणारे उद्दाम धर्मांध ! यावर उपाय म्हणजे हिंदूंनी संघटित होऊन स्वत:चे रक्षण करणे आवश्यक आहे ! – संपादक) त्यानंतरही परत एकदा घडलेल्या किरकोळ कारणावरून सलमान आणि बबलू यादव यांच्यामध्ये बाचाबाची झाली.
रत्ना यादव यांनी सांगितले की, माझा मुलगा गौरव यालाही आयेशा शेख हिचा नातू ओवेश याने दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर सलमाननेही गौरवच्या डोक्यात फरशी टाकून मारण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी माझ्या पतीने त्याला अडवले, त्यानंतर त्याने माझ्या खांद्यावर हात मारला, माझा ब्लाउज खांद्यावरून फाडला, तसेच माझे केस धरून मला मारहाण केली. तसेच मी त्यांच्याविरुद्ध तक्रार केल्यामुळे मला अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि धमकावले.
त्या वेळी सलमानने बबलू यादव यांना मारहाण करून रत्ना यादव यांचे कपडे फाडले. पोलीस ठाण्यात तक्रार केल्यामुळे त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे.
संपादकीय भूमिकाएवढ्या खालच्या स्तरावर जाऊन हिंदूंना त्रास देणार्या अशा उद्दाम धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! धर्मांधांची वाढती मुजोरी संपवण्यासाठी हिंदूंनीही धर्मांधांचे हे तंत्र ओळखून सतर्क आणि संघटित राहून विरोध करणे आवश्यक आहे ! |