करूया हरि आणि हर यांच्या दिव्य लीलांचे भावस्मरण ।
सत्ययुगात शिवाने केले हलाहल प्राशन ।
विश्वेश्वराच्या कृपेमुळे झाले संपूर्ण सृष्टीचे रक्षण ।
अनंत जिवांना प्राप्त झाले संजीवन ।
तुझ्या चरणी कृतज्ञ आहोत, हे शिवशंकर नटेशन् ।। १ ।।
द्वापरयुगात श्रीकृष्णाने उचलला धर्मरूपी गोवर्धन ।
लोप पावत चाललेल्या धर्माचे झाले रक्षण ।
कौरवरूपी दुर्जनांचे करूनी निर्दालन ।
श्रीकृष्णाने पांडवांच्या माध्यमातून केली धर्मसंस्थापना ।। २ ।।
शिव आणि विष्णु हे दोघे आहेत एकसमान ।
दोघांचेही कार्य आहे दैदीप्यमान ।
शब्द थिटे पडतात करण्या वर्णन ।
करूया त्यांच्या दिव्य लीलांचे भावस्मरण ।। ३ ।।
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४० वर्षे, सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२४)