Bhatkal Hanuman Flag : भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा फडकावला श्री हनुमानाचा ध्वज !
भटकळ (कर्नाटक) येथे ध्वजस्तंभ उद्ध्वस्त केल्याचे प्रकरण
भटकळ (कर्नाटक) – उत्तर कन्नड जिल्ह्यामधील भटकळ तालुक्यातील गुंडी गावात भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी श्री हनुमानाचा ध्वज पुन्हा फडकवाला आणि वीर सावरकर यांचा फलक पुन्हा लावला. गुंडी गावातील ध्वजस्तंभ उद्ध्वस्त करण्यात आला होता, तसेच वीर सावरकर यांचा फलक काढून टाकण्यात आला होता. याला स्थानिक हिंदु कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला होता.
Incident of removal of a flagpole in #Bhatkal (Karnataka)
BJP MP Anantkumar Hegde hoisted the flag of Shri Hanuman again pic.twitter.com/uinZdxw9Qz
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 9, 2024
भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे हे त्यांच्या कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी तेंगीनगुंडी गावात गेले होते. त्या वेळी अनधिकृतपणे ध्वजस्तंभ बांधल्याचे सांगून गावातील ध्वजस्तंभ उद्ध्वस्त केल्याचे आणि वीर सावरकर यांचा फलक काढून टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही कृती केली.