Ankit Saxena Murder Case : अकबर अली, शहनाज बेगम आणि महंमद सलीम यांना जन्मठेपेची शिक्षा !
मुसलमान मुलीशी प्रेम केल्यामुळे अंकित सक्सेना याची हत्या केल्याचे प्रकरण
नवी देहली : देहलीतील २३ वर्षीय छायाचित्रकार अंकित सक्सेना याच्या हत्याकांडातील आरोपी अकबर अली, शहनाज बेगम आणि महंमद सलीम यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या तिघांनी १ फेब्रुवारी २०१८ या दिवशी देहलीतील रघुबीर नगरमध्ये अंकित सक्सेना याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली होती. अंकितने एका मुसलमान मुलीशी प्रेम केल्याचा आरोप करून त्याची हत्या करण्यात आली होती.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार,
न्यायालयाने म्हटले आहे की, दोषी अकबर अली, शहनाज बेगम आणि महंमद सलीम यांना सुधारणेला वाव असल्याने दोषींना फाशीची शिक्षा देण्यात आलेली नाही. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील कुमार शर्मा म्हणाले की, दोषींना शिक्षा सुनावतांना परिस्थिती, वय, लिंग, सामाजिक पार्श्वभूमी, मागील पार्श्वभूमी (रेकॉर्ड), कोठडीत घालवलेला कालावधी आणि कौटुंबिक उत्तरदायित्व विचारात घेतले जाते. या प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देऊ नये, असे न्यायालयाचे मत आहे. जन्मठेपेसह न्यायालयाने प्रत्येक दोषीला अंकित सक्सेना याच्या आईला प्रत्येकी ५० सहस्र रुपये देण्याचा आदेशही दिला आहे.
मृत अंकितची आई कमलेश सक्सेना म्हणाल्या की, गेल्या ६ वर्षांत मला कोणताही पालट दिसला नाही. समाजात प्रचंड द्वेष आहे. एकटे जगणे भीतीदायक आहे. त्या म्हणाल्या, ‘‘आमचे आणि मुसलमान मुलीचे कुटुंब शेजारी रहात होते. त्या मुलीचे कुटुंब आमच्या कुटुंबासारखे होते. ते असे काही करतील याची कल्पनाही केली नव्हती.’ (यावरून मुसलमान धर्मांध आणि कट्टरवादी असतात, हे दिसून येते ! – संपादक)
संपादकीय भूमिका‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्या हिंदूंना उपदेशाचे डोस पाजणारे पुरो(अधो)गामी, धर्मनिरपेक्षतावादी आता गप्प का ? यावरून त्यांचा ढोंगी निधर्मीवाद, म्हणजे हिंदुद्वेष दिसून येतो ! |