शिवभक्त महानंदा शिवासाठी नृत्य करतांना स्फुरलेली कविता !
‘वर्ष २०१३ मध्ये मला सूक्ष्मातून दिसले, ‘शिवभक्त महानंदाला शिवाचे दर्शन झाले. तिला आत्मज्ञानाची प्राप्ती होऊन ब्रह्मनाद ऐकू आला. तिला कृतज्ञतेपोटी पुढील काव्य स्फुरले.’ देवाच्या कृपेने माझ्याकडून तिचे चित्र रेखाटले गेले आणि तिच्या मनातील ही कविता माझ्या मनःपटलावर उमटली. त्याचे लिखाण मी केले. ‘ही कविता शिवचरणी अर्पण होऊन आम्हा साधकांवर शिवाची कृपा होऊ दे’, हीच प्रार्थना आहे.
ब्रह्मांडाला व्यापून राहिला हा ब्रह्मनाद ।
शिवशंकराच्या डमरूनादात ।
मिसळून गेला घुंगरांचा नाद ।
नंदीश्वराच्या शंखनादात ।
हरवून गेले माझे पैंजणांचे मंजूळ नाद ।। १ ।।
कैलासात सामावून गेला घंटानाद ।
संपूर्ण ब्रह्मज्योतीला व्यापून राहिला शिवनाद ।
शिवाच्या कृपेने ऐकू आला हा विजयनाद ।
ब्रह्मांडाला व्यापून राहिला हा ब्रह्मनाद ।। २ ।।
– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के (वय ४० वर्षे), सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.२.२०२४)
|