अग्निशस्त्र आणि ५ जिवंत काडतुसे बाळगणार्या प्रवाशाला सोडून दिले !
रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलाचा जवान यांचा भ्रष्टाचार !
मुंबई – मध्य रेल्वेच्या सी.एस्.एम्.टी. पोलीस हद्दीत रेल्वे पोलीस तुळशीराम शिंदे आणि रेल्वे सुरक्षा दलाचा जवान मनोज कुवर सिंह यांनी एका अज्ञाताला पकडून त्याच्याकडून अग्निशस्त्र (पिस्तूल) आणि ५ जिवंत काडतुसे अवैधरित्या कह्यात घेतली. त्याच्याकडून सहस्रो रुपये घेऊन त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता त्याला तसेच सोडून दिले. त्यानंतर रेल्वे पोलिसाने अग्निशस्त्र स्वतः शोधून काढल्याचे खोटे सांगितले; पण सीसीटीव्ही चित्रीकरणामुळे खरा प्रकार उघड झाला. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तसेच त्या दोघांना अटक करण्यात आली.
अज्ञाताकडे २ पुंगळ्याही होत्या; पण आता त्यांचा वापर कुठे केला का ? त्याचा कुठे दहशत माजवण्याचा कट होता का ? त्याचा कोणत्या गुन्ह्यात सहभाग होता का ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
संपादकीय भूमिकाआतंकवादी आक्रमणाची टांगती तलवार डोक्यावर असतांनाही लोकांच्या जिवाशी खेळणार्या अशा भ्रष्ट जवानांना कडक शासन हवे ! |