मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आणखी १ गुन्हा नोंद !
बीड – मराठा समाजाला ‘ओबीसी’मधून आरक्षण देण्याची मागणी करणार्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे आणि पिंपळनेर पोलीस ठाणे येथे आणखी १ गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बीड येथे विनापरवाना फेरी काढून ‘जेसीबी’ यंत्राने फुले उधळल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील आणि इतर १२ जण यांवर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मागील १० दिवसांत जरांगे यांच्यावर हा तिसरा गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांच्यावर आतापर्यंत एकूण ५ गुन्हे नोंद झाले आहेत.