Garry Kasparov : पुतिन यांचे विरोधक असणारे बुद्धीबळपटू गॅरी कॅस्पारोव्ह यांना रशियाने ठरवले आतंकवादी !
मॉस्को (रशिया) – काही वर्षांपूर्वी जागतिक बुद्धीबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावणारे रशियाचे बुद्धीबळपटू गॅरी कॅस्पारोव्ह यांना रशियाने आतंकवादी घोषित केले आहे. विशेष म्हणजे या संदर्भात रशियाकडून कोणतेही स्पष्ट कारण देण्यात आलेले नाही. कॅस्पारोव्ह रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे दीर्घकाळ विरोधक राहिले आहेत आणि जवळजवळ एक दशकापासून ते अमेरिकेत रहात आहेत. ६० वर्षीय कॅस्पारोव्ह यांनी युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याने केलेल्या आक्रमणाच्या विरोधात वारंवार भाष्य केले आहे.