कु. मनाली शिंदे होमिओपॅथीच्या परीक्षेत राज्यात पाचवी !
कोल्हापूर – नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या होमिओपॅथीच्या परीक्षांमध्ये येथील ‘पंचाचार्य होमिओपॅथिक वैद्यकीय महाविद्यालया’तील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी कु. मनाली शिंदे ही १ सहस्र ११३ गुण मिळवून राज्यात पाचवी आली आहे. कु. मनाली शिंदे ही सनातनचे साधक आणि कोल्हापूर येथील प्रसिद्ध त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे यांची कन्या आहे. कु. मनाली प्रासंगिक सेवांमध्ये सहभागी असते.