ग्रामीण भागातील आठवडी बाजारात बनावट नोटा बाळगणार्याला अटक !
वणी (यवतमाळ), ६ मार्च (वार्ता.) – उपविभागातील घोन्सा आठवडी बाजारात प्रमोद किशन गाडगे या तरुणाला १०० रुपयांच्या २४, २०० रुपयांच्या ९ आणि ५०० रुपयांच्या ३ बनावट नोटांसह मुकुटबन पोलिसांनी रंगेहात अटक केली. यावरून ग्रामीण भागात बनावट नोटा चालवणार्यांची टोळी सक्रीय असल्याचे लक्षात येते. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका :अशांना कठोर शिक्षा केल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत ! |