महाराष्ट्र गोसेवा आयोगात १६ जणांची नियुक्ती !
मुंबई – महाराष्ट्र शासनाने ७ जुलै २०२३ या दिवशी अधिसूचना काढून गोसेवा आयोग गठीत केला होता. या आयोगामध्ये एकूण १६ जणांची नियुक्ती करण्याला राज्यशासनाकडून मान्यता देण्यात आली होती. ६ मार्च या दिवशी शासन आदेश काढून ८ शासकीय, तर ८ कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती या आयोगावर करण्यात आली आहे. शासकीय प्रतिनिधी म्हणून पशूसंवर्धन विभागाचे सहआयुक्त, २ पशूधन विकास अधिकारी (गट अ) यांसह स्वीय साहाय्यक, लेखाधिकारी, प्रशासन अधिकारी, वरिष्ठ साहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक अशी प्रत्येकी १ व्यक्तीची नियुक्ती या आयोगावर करण्यात आली आहे.