अहिल्यानगर येथे सराफ व्यावसायिकाची ३२ सहस्र ४०० रुपयांची फसवणूक !
एका धर्मांधासह अन्य एकावर गुन्हा नोंद !
अहिल्यानगर – एका महिलेने पोलीस अधिकारी असल्याचा बनाव करून येथील सराफ व्यावसायिकाची ३२ सहस्र ४०० रुपयांची फसवणूक केली. एक भ्रमणभाष क्रमांकधारक आणि अमिनुद्दीन खान यांच्या विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (पोलिसांचा धाक संपल्याने असे गुन्हे करण्यास गुन्हेगार धजावतात. – संपादक)
गणेश साळी यांचे ‘मंगलमूर्ती ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे.२ मार्चला दुकानात असतांना त्यांना एक अनोळखी भ्रमणभाष क्रमांकावरून संपर्क आला. ‘ॲप’वर रजनी सिंह असे नाव आले आणि एका महिलेच्या अंगावर पोलीस खात्याचे कपडे असल्याचे छायाचित्र दिसले. साळी यांनी संपर्क घेतला असता, ‘उज्जैन महाकाल येथून पोलीस अधिकारी बोलत आहे. तुमच्या दुकानाचे देयक आरोपीकडे सापडले आहे. आरोपीने तुमच्या दुकानात चोरीचे सोन्याचे दागिने देऊन, त्या बदल्यात दुसरा सोन्याचा दागिना केला, त्याची ५ ग्रॅमची रिकव्हरी निघत आहे,’ अशी बतावणी केली. साळी यांनी मी अशा प्रकारे कोणताही माल घेतला नाही, असे सांगताच ‘मी तुमच्यावर गुन्हा नोंद करीन’, अटक करीन अशी धमकी दिली. त्यानंतर तिने साळी यांच्या ‘व्हॉट्सअॅॅप’ला ‘क्यूआर् कोड’ पाठवला आणि त्यावर ३२ सहस्र ४०० रुपये पाठवण्यास सांगितले, तेव्हा साळी यांनी ते पैसे पाठवले.