हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खात्रीने एकत्र येतील ! – आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना
मुंबई – माझे अनुमान चुकणार नाही. हिंदुत्वाच्या सूत्रावरून उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी खात्रीने एकत्र येतील, असा विश्वास शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला आहे.
हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवता येणार नाही. पंतप्रधान मोदी यांच्याकडे उद्धव ठाकरे यांना जावे लागेल. हा दिवस लवकरच येईल. अयोध्येत श्रीरामाचे मंदिर बांधल्यापासून वेगळे वातावरण आहे. अशा वातावरणात उद्धव ठाकरे यांनाही भाजपसह जावेसे वाटले, तर त्यामध्ये काही चुकीचे नाही, असेही या वेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी म्हटले.