बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची महिला आयोगाची मागणी !
कोलकाता (बंगाल) – राष्ट्रीय महिला आयोगाच्या पथकाने नवी देहलीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या वेळी पथकाने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. या प्रसंगी पथकाने संदेशखाली येथील पीडित महिलांच्या जबानीचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द केला. तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख आणि त्याचे साथीदार यांनी महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आणि त्यांची भूमी हडप केल्याचा आरोप आहे.
सौजन्य TV9 Bharatvarsh