न्यायालयातील कार्यक्रमांच्या वेळी पूजा करण्याऐवजी राज्यघटनेपुढे नतमस्तक व्हा ! – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय एस्. ओक
|
नवी देहली – भारताने राज्यघटना स्वीकारून ७५ वर्षे होत आली आहेत. या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय एस्. ओक यांनी न्यायालयांत होणार्या कार्यक्रमांच्या वेळी पूजा करण्यासारख्या धार्मिक विधींवर बंद घालण्याचे आवाहन केले आहे.
'Avoid performing " #pooja (worship) in the court premises during any inauguration event, instead bow down before the copy of the #Constitution .' – Supreme Court Judge Justice Abhay Oka
The above act is the perfect opportunity to showcase our secularism while also celebrating… pic.twitter.com/R7oFiYUAfO
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 6, 2024
त्यांनी म्हटले की,
याएवेजी भारतीय राज्यघटनेतील धर्मनिरपेक्षतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या प्रतीसमोर नतमस्तक झाले पाहिजे. न्यायमूर्ती म्हणाले की, राज्यघटनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून धर्मनिरपेक्षता पुढे नेण्यासाठी आपल्याला सर्वोत्तम संधी आहे. माझ्यासाठी राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘लोकशाही’ हे शब्द पुष्कळ महत्त्वाचे आहेत. महाराष्ट्रातील पुणे येथील पिंपरी-चिंचवड येथे नुकत्याच झालेल्या नवीन न्यायालयाच्या इमारतीच्या पायाभरणी कार्यक्रमात न्यायमूर्ती ओक बोलत होते.
सौजन्य : लाईव लॉं
संपादकीय भूमिकाभारताची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असली, तरी राज्यघटनेच्या पहिल्या पानावर प्रभु श्रीरामाचे चित्र आहे. त्याचाही आदर राखला जावा, असेच बहुसंख्य भारतियांना वाटते ! |