Tamil Nadu Drugs Seized : तमिळनाडूजवळील समुद्रातून पकडलेल्या नौकेतून ९९ किलो अमली पदार्थ जप्त
चेन्नई (तमिळनाडू) – चेन्नई झोनल युनिट आणि भारतीय तटरक्षक दल यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत येथील समुद्रात पाठलाग करून एका नौकेला पकडले. या नौकेतून ९९ किलो चरस हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. याचे मूल्य १०८ कोटी रुपये आहे. या नौकेतील ३ जणांना पकडण्यात आले आहे.
In its continuous hunt against smuggling of narcotics substances @IndiaCoastGuard & #DRI Chennai in a joint operation apprehended a country boat off #Mandapam & seized 99 kgs hashish drug worth Rs 108 crores. #anti-narco ops pic.twitter.com/gtXL6zmuAq
— Indian Coast Guard (@IndiaCoastGuard) March 5, 2024
हा अमली पदार्थ तमिळनाडूच्या पंबन किनारी भागातील एका व्यक्तीने या तिघांना दिला होता आणि तो श्रीलंकेतील एका व्यक्तीला देण्यास सांगितले होते. यानंतर पोलिसांनी पंबन भागातून या व्यक्तीला अटक केली. त्याच्या चौकशीत तो श्रीलंकेत किनारी मार्गाने अमली पदार्थांच्या तस्करीचा प्रमुख असल्याचे उघड झाले.