जागावाटपाविषयी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा !
मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ५ मार्च या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. ठाकरे यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. जागावाटपाविषयी ६ मार्च या दिवशी महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. बैठकीपूर्वी धोरणात्मक निर्णयाच्या दृष्टीने दोघांत चर्चा झाली.