विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे ई मेल ‘हॅक’ !
(ई मेल हॅक करणे म्हणजे ‘एखाद्या व्यक्तीचा ई मेलचा पासवर्ड अवैधपणे प्राप्त करून संबंधित व्यक्तीच्या अपरोक्ष ई मेलचा उपयोग करणे’)
मुंबई – विधानसभेचे अध्यक्ष अधिवक्ता राहुल नार्वेकर यांचा ई मेल आयडी ‘हॅक’ करण्यात आला आहे. या प्रकरणी नार्वेकर यांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. सभागृहात योग्य वर्तन करत नसलेल्या आमदारांवर कारवाई करण्याविषयीचे पत्र राहुल नार्वेकर यांच्या ई मेलवरून राज्यपाल रमेश बैस यांना मेल करण्यात आले आहे. याविषयी राज्यपालांच्या कार्यालयातून अधिक माहिती घेण्यासाठी संपर्क करण्यात आल्यावर अशा प्रकारचा कोणताही मेल पाठवण्यात आलेला नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले. या वेळी नार्वेकर यांचे ई मेल आयडी ‘हॅक’ झाल्याचा प्रकार पुढे आला.