मोदी यांना ३ र्यांदा निवडून दिले, तर देश ३ र्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर जाईल ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
जळगाव – सर्व पक्षांना त्यांच्या परिवाराला पक्षात पुढे आणायचे आहे. केवळ भाजपला आणण्यासाठी नाही, तर वर्ष २०४७ मध्ये भारताचे भविष्य घडवण्यासाठी, भारताला सुरक्षित करण्यासाठी मतदान करा. मोदी यांनी भारताच्या सीमा सुरक्षित केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांना ३ र्यांदा निवडून दिलेत, तर देश ३ र्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवर जाईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते जळगाव येथील युवा संमेलनात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, मोदी यांचा १० वर्षांचा कामाचा इतिहासही आहे आणि देशासाठी पुढील २५ वर्षांची दूरदृष्टीही त्यांना आहे. त्यांनी प्रत्येक दिवशी ७५ सहस्र लोकांना दारिद्र्यरेषेबाहेर आणले आहे. नोकरीसाठी जसा ‘बायोडेटा’ पाहिला जातो, तसाच ‘बायोडेटा’ पंतप्रधान होणार्या उमेदवाराचा पाहिला पाहिजे. मोदी यांनी ‘वन रँक वन पेन्शन’ दिले. विधीमंडळात ३३ टक्के आरक्षण महिलांसाठी दिले.
अमित शहा यांनी छत्रपती संभाजीनगर येथेही सभा घेतली. येथे त्यांनी ‘एम्.आय.एम्.’ला उखडून फेकण्याचे आवाहन केले.