PM Modi Death Threat : पंतप्रधान मोदी यांना कर्नाटकातील महंमद रसूल नावाच्या व्यक्तीकडून ठार मारण्याची धमकी

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘केंद्रात काँग्रेसची सत्ता आल्यास मी मोदी यांना जिवे मारणार’, अशी धमकी कर्नाटकमधील महंमद रसूल कद्दारे नावाच्या एका व्यक्तीने दिली आहे. त्याने समाजिक माध्यमांतून हातात तलवार घेतलेला एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओवरून सूरपूर पोलीस ठाण्यात या महंमद रसूल याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

  • पंतप्रधान मोदी यांना कुणाकडून धोका आहे, हे यातून लक्षात येते !
  • कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आल्यापासून धर्मांध मुसलमानांचे किती फावले आहे, हेच ही धमकी दर्शवते ! ‘काँग्रेसमुक्त भारत’ किती आवश्यक आहे, हे हिंदूंच्या कधी लक्षात येणार ?