TMC MLA Ram Mandir : (म्हणे) ‘अयोध्येतील श्रीराममंदिर अपवित्र असून हिंदूनी पूजा करू नये !’ – तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदू सिन्हा
बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार रामेंदू सिन्हा यांचे संतापजनक विधान !
कोलकाता (बंगाल) – अयोध्येत श्रीराममंदिर बांधले गेले आहे. कोणत्याही हिंदूने या मंदिरात पूजा करण्यासाठी जाऊ नये. जर पंतप्रधान मोदी ब्राह्मण नाहीत, तर ते प्राणप्रतिष्ठा कसे करू शकतात?, असे विधान तृणमूल काँग्रेसचे बंगालच्या तारकेश्वर येथील आमदार रामेंदू सिन्हा यांनी केले आहे. याचा एक व्हिडिओ त्यांनी सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला आहे. या विधानावरून भाजपने टीका केली आहे.
Simply Outrageous.
TMC MLA of Tarakeswar Assembly Constituency – Ramendu Sinha Roy, who is also the TMC President of Arambagh Organizational District has labeled the Grand Ram Mandir as ‘UNHOLY’. He has also stated that no Indian Hindu should offer Puja at such unholy site.… pic.twitter.com/xBBQuqpTzn
— Suvendu Adhikari (Modi Ka Parivar) (@SuvenduWB) March 4, 2024
बंगालमधील भाजपाचे नेते आणि विरोधी पक्षेनेते सुवेंदू अधिकारी यांनी म्हटले की, या अपमानास्पद वक्तव्याची मी केवळ निंदा करत नाही, तर जगभरातील हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांच्या विरोधात तक्रार करण्याची सिद्धता करत आहे.
'Ayodhya's Shri Ram Mandir is an unholy place and Hindus should not offer Puja there !'
– Bengal #TrinamoolCongress MLA Ramendu Sinha's appalling statement !
TMC MLA who blabbers anything simply because he has a mouth !pic.twitter.com/L41oe0swWt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 5, 2024
संपादकीय भूमिकातोंड आहे म्हणून काहीही बरळणारे तृणमूल काँग्रेसचे आमदार ! |