मराठा समाजाला आरक्षण दिल्याविषयी सकल मराठा समाजाकडून शासनाचे अभिनंदन !
कोल्हापूर – मराठा समाजाच्या वतीने २८ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी तरुण मंडळ हॉल या ठिकाणी मराठा आरक्षण याविषयी चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली होती. यात मराठा समाजाला आरक्षण दिल्याविषयी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते विधानसभा आणि विधान परिषद यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. तो ठराव आणि समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. या प्रसंगी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, संजयसिंह साळोखे, प्रसन्न शिंदे-शिराळकर, जितेंद्र पाटील, विकास सुर्वे, संभाजीराव खेबुडकर, राजू तोरस्कर, किशोर घाटगे यांसह अन्य उपस्थित होते.