साधकांनो, घरी राहून साधना करणारे आई-वडील किंवा नातेवाईक यांची आध्यात्मिक प्रगती होत असल्याचे लक्षात आल्यास त्यांच्याविषयीचे लिखाण ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी पाठवा !

 

‘राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण हे कार्य अन् वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती यांसाठी सनातनचे काही साधक पूर्णवेळ साधना करतात. त्यांपैकी काही साधक अध्यात्मप्रसाराची सेवा करतात, तर काही सनातनच्या आश्रमांत राहून तेथे सेवा करतात. त्यांचे आई-वडील किंवा इतर नातेवाईक घरी राहून विविध साधनामार्गांनुसार साधना करत असतात. त्यांनी अनेक वर्षे सातत्याने साधना केलेली असते, तसेच आपल्या मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी अनुमती दिलेली असल्याने त्यांचा मोठा त्यागही झालेला असतो. त्यामुळे ‘त्यांचा चेहरा तेजस्वी दिसणे, त्यांच्यातील स्वभावदोषांचे प्रमाण न्यून होणे, प्रेमभाव, ईश्वरी अनुसंधान आणि आनंद यांत वाढ होणे’ इत्यादी आध्यात्मिक प्रगती दर्शवणारे पालट त्यांच्या संदर्भात लक्षात येतात. त्यांची साधना वाढल्याने घरातील वातावरणात चांगले पालट होतात.

साधकांनी आपल्या घरी राहून साधना करून आध्यात्मिक प्रगती करणारे आई-वडील किंवा इतर नातेवाईक यांच्या संदर्भातील सूत्रे लिहून दिल्यास इतर साधक आणि त्यांचे नातेवाईक यांना त्यांतून शिकता येईल अन् आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी त्यांना दिशाही मिळेल.

साधकांनी वरील सूत्रे साधारण पुढील नमुन्याप्रमाणे लिहून द्यावीत.

१. आई-वडील / नातेवाईक यांनी केलेली साधना

२. साधना करतांना त्यांना आलेल्या अनुभूती

३. त्यांनी पूर्णवेळ साधना करणार्‍या आपल्या पाल्यांना साधनेत केलेले साहाय्य

४. आई-वडील / नातेवाईक यांच्यात जाणवलेले पालट, तसेच त्यांच्या साधनेमुळे घरातील वातावरणात झालेले पालट ही सूत्रे वैशिष्ट्यपूर्ण आणि थोडक्यात असावीत. लिखाणाच्या समवेत त्यांचे छायाचित्रही पाठवावे.

संगणकीय पत्ता : sankalak.goa@gmail.com

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा, पिन – ४०३४०१.’

– ग्रंथ विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.२.२०२४)