संपादकीय : भारतात असे करा !
भारतात मोगल आणि इंग्रज येण्यापूर्वी गुरुकुल पद्धतीद्वारे शिक्षण दिले जात होते. इतकेच नाही, तर इंग्रजांनी मेकॉलेप्रणित शिक्षण व्यवस्था आणण्यापूर्वी भारतात सहस्रो गुरुकुल होते आणि तेथे हिंदु मुले-मुली शिक्षण घेत होती. मेकॉलेने हे जाणीवपूर्वक बंद करून भारतात कारकून निर्माण करणारी शिक्षणपद्धत आणून हिंदूंना त्यांच्या धर्मापासून पद्धतशीरपणे दूर केले. आज त्याची फळे हिंदू भोगत आहेत. दुसरीकडे भारतात मुसलमानांची शिक्षणपद्धत; म्हणजे मदरसे व्यवस्थित चालू आहेत. सरकारकडून त्यांना अनुदानही मिळत आहे. येथे मौलवी, इमाम आदी या मुलांना शिक्षण देत आहेत. ते काय शिक्षण देतात ? आणि त्याचा देशात काय परिणाम होतो ? हेही समोर आले आहे. मदरशांतून जिहादी मानसिकतेचे तरुण, तसेच आतंकवादी सिद्ध होतात, हे अनेकदा उघड झाले आहे. इतकेच नव्हे, तर या मदरशांमध्ये मुला-मुलींचे लैंगिक शोषण होते ते वेगळेच ! तरीही धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली हे प्रकार भारतीय शासनकर्ते खपवून घेत आहेत. काही राज्यांमध्ये यांवर आता आळा घालण्याचा प्रयत्न होत असला, तरी ते प्रमाण अत्यंत नगण्य आहे. मदरसे आणि मशिदी येथे इमाम मुसलमानांना काय शिकवतात ? याकडे गुप्तचर यंत्रणांचे कदाचित् लक्ष असेल आणि ते त्यांचा अहवाल संबंधित राज्य सरकारांना पाठवत असतील; मात्र त्यावर काही कृती होत आहे, असे दिसून येत नाही. काहीतरी मोठे कारण असले, तरच कृती होतांना दिसते. भारतात ही स्थिती आहे; मात्र विदेशात कठोर निर्णय घेतले जात आहेत. फ्रान्स आणि ब्रिटन आता हा प्रयत्न करू लागले आहेत. डेन्मार्कमध्ये अशा प्रकारच्या कृतीची मागणी होत आहे. नेदरलँड्समध्ये, तर यासाठी संघर्ष चालूच आहे. युरोपमधील देशांना जेव्हा जिहादी मानसिकतेची झळ जाणवू लागली, तेव्हा त्यांनी जिहाद्यांचा बंदोबस्त करण्यास प्रारंभ केला. तेथे मुसलमानांचे लांगूलचालन करून सत्ताप्राप्ती करण्याच्या देशद्रोही मानसिकतेचे राजकारणी नाहीत, हे त्या देशाचे आणि जनतेचे भाग्यच म्हणावे लागेल. फ्रान्सने गेल्या वर्षी ३८ सहस्र घुसखोर मुसलमान निर्वासितांना देशाबाहेर हाकलले, तर यावर्षी २३ सहस्र घुसखोरांना हाकलण्यात येणार आहे. यापूर्वी अनेक इमामांनाही फ्रान्सने हाकलले आहे. युरोपमध्ये सर्वाधिक मुसलमान फ्रान्समध्येच असून ते नेहमीच फ्रान्समध्ये हिंसाचार करत असतात. गेल्या वर्षी फुटबॉल विश्वचषकावरून मोरोक्को या इस्लामी देशातील निर्वासितांनी फ्रान्समध्ये मोठा हिंसाचार केला होता. भारतात जशा हिंदुत्वनिष्ठ संघटना जिहाद्यांना विरोध करतात, तसेच फ्रान्समध्ये तेथील भूमीपूत्र लोकांच्या संघटना करत असल्याचे दिसून येत नसल्याने तेथे जिहाद्यांना विरोध केवळ प्रशासन आणि पोलीस यांनाच करावा लागतो. येथेही तथाकथित मानवाधिकाराचा विचार करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. फ्रान्समध्येच ‘शार्ली हेब्दो’ नियतकालिकावर मोठे आक्रमण झाले होते, हे कुणीही विसरू शकणार नाही. भारतातही जिहादी आणि आतंकवादी गेली ३३ वर्षे कारवाया करतच आहेत. यावर आता नियंत्रण मिळवण्यास यश मिळत आहे, असेही दिसत आहे.
भारत अद्यापही गांधीवादी भूमिकेत !
मध्य-पूर्वेमध्ये आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया यांसारख्या आशियाई इस्लामी देशांतून मोठ्या संख्येने ब्रिटनमध्ये, तर या देशांसह आफ्रिका खंडातील इस्लामी देशांचे निर्वासित अन् घुसखोर नागरिक मोठ्या संख्येने फ्रान्समध्ये रहात आहेत. भारतातही काही कोटी बांगलादेशी मुसलमान घुसखोर रहात आहेत आणि त्यात म्यानमारच्या रोहिंग्या मुसलमानांची भर पडली आहे; मात्र या दोघांनाही गेल्या काही दशकांमध्ये कारवाई करून सहस्रोच्या संख्येने देशाबाहेर हाकलण्यात आले आहे, असे कधी झाल्याचे दिसून आलेले नाही. भारताने तसे कार्य फ्रान्सकडून शिकले पाहिजे. फ्रान्सने आक्षेपार्ह कारवाया करणार्या मशिदींना टाळे ठोकण्याचा कायदा यापूर्वीच केला आहे. भारताने असा कायदा अद्याप केलेला नाही, हे लज्जास्पद आहे. भारताचा शेजारी असणारा चीन भारत, फ्रान्स आणि ब्रिटन यांच्यापेक्षा अधिक हुशार आहे. त्याने चीनमध्ये जिहादी मानसिकता निर्माण होऊ नये, इस्लामी आतंकवाद निर्माण होऊ नये; म्हणून त्याच्या शिनजियांग प्रांतातील उघूर मुसलमानांना सुधारगृहात ठेवून त्यांच्यावरील इस्लामी संस्कार नष्ट करून त्यांच्यावर चिनी संस्कृतीचा संस्कार करत आहे आणि विशेष म्हणजे यावर जगातील सर्व देश, तसेच इस्लामी देशही मौन बाळगून आहेत. भारतात मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत असतांना इस्लामी देशांची संघटना उलट भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचे खोटे आरोप करते आणि भारत मौन बाळगतो. जागतिक पटलावरील चालणार्या या घटनांचा अभ्यास केला, तर भारत अद्यापही गांधीवादी भूमिकेत आहे आणि देशाचा आत्मघात करून घेत आहे, हे लक्षात येते.
भारताने स्वतःच घेतलेले जोखड !
जगात सर्वाधिक मुसलमान इंडोनेशियात आहेत आणि त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. पाकिस्तानही भारताच्या मागे आहे. याच्या व्यतिरिक्त बांगलादेश, म्यानमार येथील घुसखोर मुसलमानांची संख्याही कोटींमध्ये आहे. त्यामुळे जगात सर्वाधिक मुसलमान भारतात आहेत, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये. भारताची फाळणी झाली, तेव्हा मुसलमानांसाठी वेगळा पाकिस्तान देश देण्यात आला; मात्र काँग्रेसने, विशेषतः म. गांधी यांनी ज्या मुसलमानांना भारतात रहायचे आहे, ते राहू शकतात, असे सांगितल्याने तेव्हा राहिलेले मुसलमान आज २० कोटींपर्यंत वाढले आहेत. पाकिस्तानात आज २५ कोटी मुसलमान आहेत. म्हणजे भारताची येथेच मोठी चूक झालेली आहे आणि तीच गेली ७५ वर्षे देशातील असंतोषाचे कारण ठरली आहे. ही चूक सुधारण्याचा किंवा याचा परिणाम सौम्य करण्याचा प्रयत्न स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत कुणीही कठोरपणे केला नाही; मात्र मागची १० वर्षे सोडली, तर ६५ वर्षे या चुकीला साहाय्य होणाराच कारभार सर्वपक्षीय शासनकर्त्यांकडून करण्यात आला. आता काही प्रमाणात सरकार कठोर होत आहे. तरीही काही ठोस निर्णय घेणे आवश्यक आहेत. घुसखोरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसत नाही, मदरशांतील शिक्षण बंद केले जात नाही. आक्षेपार्ह कारवाया करणार्या मशिदींना टाळे ठोकले जात नाही. धर्मांतरविरोधी कायदा, गोहत्याबंदी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, समान नागरी कायदा, वक्फ बोर्ड कायदा रहित करणे, असे निर्णय घेतले जात नाहीत आणि पुढे घेतले जाणार आहेत, असेही दिसत नाही. ब्रिटन आणि फ्रान्स यांनीही भौतिक विकास केला आहे; पण त्यांना घुसखोरांवर कारवाई करावी लागत आहे, याचा विचार झाला पाहिजे.
जिहाद्यांची झळ बसू लागल्यावर युरोपमधील देश त्याविरोधात कृती करतात; मात्र भारत याचा बळी ठरूनही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद ! |