MJ Akbar On Islam : मुसलमानांच्या पापांसाठी इस्लाम उत्तरदायी नाही ! – ज्येष्ठ पत्रकार एम्.जे. अकबर
नवी देहली – मुसलमानांच्या पापांसाठी इस्लामला दोष देऊ नका. त्यांनी केलेल्या पापांसाठी इस्लाम उत्तरदायी नाही, असे वक्तव्य माजी परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आणि ज्येष्ठ पत्रकार एम्.जे. अकबर यांनी म्हटले आहे. खुसरो फाउंडेशनने नवी देहली येथील ‘इंडिया इंटरनॅशनल सेंटर’ येथे आयोजित केलेल्या ‘क्या है गझवा-ए-हिंद की हकीकत ?’ (गझवा-ए-हिंदचे वास्तव काय आहे ?) या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. गजवा-ए-हिंद म्हणजे काफिरांना ठार मारून भारताचे इस्लामीस्तान करण्यासाठी पुकारलेले युद्ध होय. हे पुस्तक म्हणजे ‘गझवा-ए-हिंद’वर लिहिलेल्या आठ लेखांचा संग्रह आहे. या पुस्तकाचे संकलन आणि संपादन डॉ. हफिजुर रहमान यांनी केले आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या वेळी ते लिहिणारे चार लेखकही उपस्थित होते.
‘गझवा-ए-हिंद’ ही संकल्पना फसवी आणि खोडकर !
एम्.जे.अकबर यांनी कुराणातील काही संदर्भ देत म्हटले की, कुराण सांगते की, तुम्ही तुमच्या धर्माचे पालन करा. अशा स्थितीत धर्माच्या नावाखाली कोणत्याही देशावर विनाकारण आक्रमण करण्याचा प्रश्न येतोच कुठे ? प्रेषित पैगंबर यांनीही त्यांच्या कठीण काळातही कधीही युद्ध पुकारले नाही. इस्लाममध्ये झाडे जाळण्यासही बंदी आहे. एका हदीसमध्ये ‘गझवा-ए-हिंद’ ही कल्पना केवळ फसवीच नाही, तर खोडकरही आहे.
संपादकीय भूमिकाजगभरात अनेक वाईट गोष्टींसाठी मुसलमान समाज कुप्रसिद्ध आहे. ‘असे का ?’, याचे उत्तर मुसलमान विचारवंतांनी शोधून त्यावर उपाययोजना काढणे आवश्यक ! |