निधन वार्ता !
सांगली – येथील सनातनचे साधक सुरेश जाखोटिया (वय ६५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) यांचे २ मार्च या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात १ मुलगा, सून, १ मुलगी, जावई, २ नातवंडे असा परिवार आहे.
ते मध्यप्रदेश आणि राजस्थान येथे हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया (आध्यात्मिक स्तर ६४ टक्के) यांचे काका, तसेच सनातन संस्थेच्या देवद, पनवेल आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे श्री. नटवरलाल जाखोटिया (आध्यात्मिक स्तर ६३ टक्के) यांचे धाकटे बंधू होत. सनातन परिवार जाखोटिया कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.