पुणे येथे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंद !
पंतप्रधानांचा पुतळा जाळल्याचे प्रकरण
पुणे – काँग्रेस भवन येथे युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. देहली-हरियाणा सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनामध्ये एका शेतकर्याचा मृत्यू झाला. या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौकात जमले होते. कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. तेथे बंदोबस्तास असलेले डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांनी कार्यकर्त्यांना रोखले, तसेच त्यांना कह्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा नोंदवला.