भगवतीदेवीच्या चरणप्राप्तीचे महत्त्व !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
क्षितौ षट्पञ्चाशद् द्विसमधिकपञ्चाशदुदके
हुताशे द्वाषष्टिश्चतुरधिकपञ्चाशदनिले ।
दिवि द्विष्षट्त्रिंशन्मनसि च चतुष्षष्टिरिति ये
मयूखास्तेषामप्युपरि तव पादाम्बुजयुगम् ।।
– सौन्दर्यलहरी, श्लोक १४
अर्थ : हे भगवती, मूलाधारात असलेले ५६ किरण, मणिपूरच्या जलतत्त्वातील ५२, स्वाधिष्ठानच्या अग्नितत्त्वातील ६२, अनाहतमधील वायुतत्त्वातील ५४, विशुद्ध चक्रातील आकाशतत्त्वाचे ७२ आणि आज्ञाचक्रस्थ मनस्तत्त्वातील ६४ असे जे तुझे किरण आहेत त्या सर्वांहून तुझे चरणकमलयुगल हे वर आहेत. उपरोक्त ३६० किरणांचा जरी लाभ झाला, तरी तू दूरच आहेस; परंतु तुझ्या कृपेने तुझ्या चरणांचा लाभ झाला, तर या सार्या किरणांची प्राप्ती सहजच होते.
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑगस्ट २००९)