Darling Sexual Harassment Court: अनोळखी महिलेला ‘डार्लिंग’ (प्रिये) म्हणणे लैंगिक छळ ! – कोलकाता उच्च न्यायालय
कोलकाता (बंगाल) – अज्ञात महिलेला ‘डार्लिंग’ (प्रिये) म्हणणे हा लैंगिक छळ आहे आणि ३५४ (ए) १ अंतर्गत दंडनीय गुन्हा आहे, असे कोलकाता उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेअर खंडपिठाने एका खटल्यात निर्णय देताना म्हटले.
Calling an unknown woman 'Darling' constitutes sexual harassment! – Calcutta High Court
Making such statements about unknown women indicates the declining morality of society
Image Source: @barandbench pic.twitter.com/8BQt1PX6ZN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 3, 2024
या प्रकरणात आरोपी जनकराम गुप्ता याने एका महिला शिपायावर ‘प्रिये चलान कापण्यासाठी आली आहेस का?’ अशी टिप्पणी केली होती. हे प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने म्हटले की, हा केवळ कोणत्याही महिला पोलीस कर्मचार्याचाच नव्हे, तर कोणत्याही महिलेचा लैंगिक छळ आहे. (थेट महिला पोलीस शिपायाला असे म्हणण्याचे धाडस करणार्याला पोलिसांचा वचक राहिलेला नाही, हेच लक्षात येते ! हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअनोळखी महिलांविषयी अशी वक्तव्य करणे, हे समाजाची नैतिकता अधिकाधिक अधोगतीकडे जात असल्याचेच दर्शक ! |